चक्‍क पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) पिस्तूल चोरले

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – मुर्तीजापूर पोलीस ठाण्यातून अकोला येथे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये चोरट्यांनी घरातील दागिन्यांसह जोशी यांची सरकारी पिस्तूल चोरून नेली. हा प्रकार आज (रविवार) दुपारी गीता नगर येथे उघडकीस आला.

मुर्तीजापूर येथून अकोला येथे बदली झालेले जोशी हे शनिवारी कुटुंबासमवेत बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी जोशी यांच्या आर्शिर्वाद अपार्टमेंटमधील घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि त्यांची शासकीय पिस्तूल चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन चोरट्यांचा शोध सुरु केला.

पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, जुने शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. जुने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

आरोग्यविषय वृत्त –

Loading...
You might also like