घरफोड्या करणारा सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईताला कोंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २ घरफोडीचे गुन्हे उघड करत पोलिसांनी १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजकुमार ओमकारअप्पा आपचे ( २५, रा. हिंगणेमळा हडपसर, मुळगाव मु. पो. कोथली, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री चोकातील राजदिप कॉम्पलेक्समधील फ्लॅट क्र. २०३ चे कुलुप उचकटून अज्ञात चोरट्याने १ लाख ७८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यावेळी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस नाईक साळुंखे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकुमार आपचे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर त्याने राजदिप सोसायटी व श्रया स्नेह सोसायटी येथे २ घऱफोड्या केल्या. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. त्याने या पैशांतून खरेदी केलेला एक सॅमसंग मोबाईल खरेदी केला होता. तो देखील जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आय़ुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी राजस शेख, संजय कदम, विलास तोगे, सुरेंद्र कोळगे, योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, जयंत चव्हाण, निलेश वणवे, अजिम शेक, उमाकांत स्वामी, आदर्श चव्हाण, उमेश शेलार यांच्या पथकाने केली.