सराफावर गोळीबार करुन ६२ लाखांचा ऐवज लंपास, सराफ गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – कोकणे चौकातील पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीवर पाच जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून ६२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी तब्बल अडीच किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या केलेल्या गोळीबारात दिव्यांक प्रदीप मेहता (वय-२५ रा. आर्य वेदात रेसीडेन्सी, लिंकरोड, रहाटणी) हे जखमी झाले आहेत. चोरट्यांनी दोन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक गोळी दिव्यांक यांच्या डाव्या पायाला लागली.

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी दुकानात येऊन दुकानाचे शटर बंद करुन दरोडा  टाकाला. अवघ्या दहा मिनीटात दरोडेखोरांनी दुकानातील दागिने घेऊन तेथून पळून गेले. या गुन्ह्यातील सर्व आरोपी २५ ते ३० वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोकणे चौकातील सराफी पेढीवर दरोडा पडल्याची घटना समजता वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्यांसह दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरुन नेला आहे. यामुळे दरोडेखोरांना शोधणे पोलिसांसमोर आवाहन आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.

कोकणे चौकात आकाश गंगा सोसायटीतील सराफावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. सोनाराला लुटण्याच्या हेतूने हा गोळीबार केला असल्याचे बोलले जात आहे. कोकणे चौकात असलेल्या पुणेकर ज्वेलर्स मध्ये घुसून गोळीबार करण्यात आलेला आहे. यामध्ये सराफाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. चोरट्यानी दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले आहे. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी सराफ दुकानात घुसून गोळीबार झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांचे पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

पुणे \ पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार 

पिंपरी : भावानेच केले बहिणीवर कोयत्याने सपासप वार

पुणे \ पिंपरी : पोलीस महासंचालकांना दरोडेखोरांनी दिली गोळीबार करून ‘सलामी’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us