पुण्यातील ‘आयनॉक्स’ मल्टिप्लेक्समध्ये गल्यावर मारला सुरक्षारक्षकानेच डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात एका मल्टिप्लेक्समध्ये १ लाख ५६ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पुणे स्टेशन येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात हा प्रकार घडला असून ही चोरी सुरक्षारक्षकाकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी आतिश कांबळे याला अटक करण्यात आली असून या तरुणाचे वय २६ वर्ष असून तो भीमनगर, मुंढवा भागातील रहिवाशी आहे. अंकूर कटपाल यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१ लाख ५६ हजार रुपयांवर डल्ला
फिर्यादी अंकूर कटपाल हे आयनॉक्स मॉलचे व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडे आयनॉक्स चित्रपटगृहाची जबाबदारी आहे. तर प्रसून कोले यांच्याकडे चित्रपट गृहातील शो आणि खाद्यपदार्थांतून जमा झालेला पैसा मोजण्याची जबाबदारी आहे. नेहमी प्रमाणे कोले यांनी मोजलेली १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कॅशकाऊंटरवर गुरुवारी रात्री जमा केली होती.

सीसीटीव्ही फूटेजमधून चोरी उघड
शुक्रवारी सकाळी ही रक्कम भरण्यासाठी कोले बँकेत जाणार होते. परंंतू कॅशकाऊंटर उघडल्यावर त्यात ठेवलेली रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर सीसीटीव्हीची पाहणी केली असता कळाले की सुरक्षारक्षक कांबळे यांनी ही चोरी केल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही माहिती कोले यांच्याकडून वरिष्ठांना देण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच