उघड्या दरवाजाद्वारे चोरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – आळंदी येथे अर्धवट उघड्या दरवाजातुन आत प्रवेश करुन चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी बद्रीनाथ नारायण नरोडे (३०, रा. निजानंद बाबा आश्रम इंद्रायणीनगर, आळंदी देवाची) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बद्रीनाथ हे घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून प्रवेश केला. घरात ठेवलेले एक लॉपटॉप आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तपास दिघी पोलीस करीत आहेत.