चोरीचा ट्रक पोलिसांकडून हस्तगत; चौघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा चाकी ट्रक चोरुन नेणाऱ्या टोळीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच चोरीचा ट्रकही जप्त करण्यात आलेला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’82a3bf58-aa8d-11e8-a7c8-3b47a228d0ca’]

मंगेश बालासाहेब वाकडे (२३, रा. बीटरगांव ता.रेणापूर जि. लातूर), विकास धीराम नायकवडे (२४, रा. सुलतानपूर ता.जि.बीड), मारुती लहू कदम (२०, रा. आंबील वडगाव ता.जि.बीड), विकास दत्तात्रय वाघमोडे (२७, रा. किट्टी आडगाव ता.माजलगांव जि.बीड) या चौघांना अटक केली आहे.

खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या ट्रकचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान हे चोरटे मोशी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. एका इंडिका कारमधून संशयितरित्या फिरत असलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता यांनी ट्रक चोरी केल्याचे समजले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच ट्रक ठेवलेल्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. तेथून चोरलेला ट्रक हस्तगत करण्यात आला आहे. तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

माओवाद्यांच्या थिंक टँकवर देशभरात छापे