सांगलीत अट्टल चोरास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन  – घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताला अटक करण्यात आली. सुनील विठ्ठल तडसरे (वय 27, रा लक्ष्मीनगर, बुधगाव) असे त्याचे नाव आहे. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. माधवनगर येथील रविवार पेठेत ही कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक सुुुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.

त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथक तयार केले आहे. पथकातील पोलिस माधवनगर परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी सुनील तडसरे हा संशयास्पद रित्या फिरतांना आढळून आला. त्याचा सखोल चौकशी केली असात घरफोडी, चोरीचे 12 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. चोरट्यांची टोळी तयार करून तो घरफोडी करीत होता. सध्या तो सक्रीय असून त्याच्या वर्तनामुळे नागरिकांच्या मालमत्तेचा धोका असल्याने त्याला अटक करण्यात आली. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज पाटील, अशोक डगळे, वैभव पाटील, शशिकांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.