home page top 1

दिवसाढवळ्या पोलिसाला मारहाण करून लुबाडले

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – दूध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाला दोन चोरट्यांनी विटेने मारहाण करून लुटल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. ही घटना भोसरी येथील चांदणी चौकात रविवारी दुपारी याप्रकरणी पोलीस शिपाई भिमाजी सावळेराम मोघे (वय-४७ रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्य़ादी भिमाजी मोघे हे दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी दुपारी नातवासाठी दूध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी दोन अद्यात चोरट्यांनी त्यांना आडवले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मोघे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चोरट्यांनी त्यांना विटेने मारहाण केली. चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील दीड हजार रुपये चोरून नेले. या घटनेत मोघे जखमी झाले आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like