‘मिस इंडिया’चा किताब जिंकणारी ‘ही’ अभिनेत्री आज ओळखूही येत नाही, केलं होतं ‘B ग्रेड’ सिनेमात काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 80 आणि 90 च्या दशकातील अभिनेत्री सोनू वालियाचा जन्म 19 फेब्रुवारी 1964 रोजी दिल्लीच्या पंजाबी फॅमिलीत झाला होता. सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर सोनू आता विस्मृतीत आयुष्य काढत आहे. तिच्या लुकमध्येही खूपच बदल झाल्याचं दिसत आहे. तिला पाहिल्यानंतर तिला ओळखणंही मुश्किल वाटत आहे.

सोनू वालियानं आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यात यश आल्यानंतर तिनं मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि 1985 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचा रस्ता मोकळा झाला.

1988 साली आलेल्या खून भरी मांग या सिनेमात तिनं पहिल्यांदा काम केलं. या सिनेमात अभिनेत्री रेखानं प्रमुख भूमिका साकारली होती परंतु या सिनेमातून सोनूलाही ओळख मिळाली. यासाठी तिला बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

1988 मध्ये आलेल्या आकर्षण सिनेमात सोनू वालियानं अनेक बोल्ड सीन्स दिले. त्याकाळी बोल्ड सीन्स करणं सोपी गोष्ट नव्हती. एका झऱ्याच्या बाजूला तिच्यावर काही हॉट सीन शुट करण्यात आले होते ज्यानं धुमाकूळ घातला होता. सोनूच्या मुख्य सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर दिल आशना है, खेल, स्वर्ग जैसा घर, आरक्षण, अपना देश पराए लोग, तूफान, तहलका असे अनेक सिनेमे सांगता येतील. परंतु सोनूला खास काही यश मिळालं नाही. यानंतर तिनं बी ग्रेड सिनेमात काम करण्यास सुरुवात केली.

यानंतर सोनू सिनेमे सोडून लग्न केलं. सोनूनं एनआरआय सूर्य प्रकाश सोबत लग्न केलं. सूर्य प्रकाशच्या निधनानंतर सोनूनं एनआरआय फिल्म प्रोड्युसर प्रताप सिंह सोबत दुसरं लग्न केलं. सध्या ती युएसलाच रहाते. तिला एक मुलगी आहे. सोनू एवढी बदलली आहे की, ओळखूही येत नाही.