… तर मग चिनी अ‍ॅपप्रमाणेच ‘नमो अ‍ॅप’वरही बंदी घाला, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या चीनच्या 59 अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी घेतला. बाजारामध्ये कोट्यावधी संख्येने विकल्या जाणाऱ्या चीनी कंपनीच्या मोबाईलमध्ये यापैकी अनेक अॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अॅपचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने भाजपला टार्गेट केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारकडे आणखी एका अॅपवर बंदी घालण्याची मागणी ट्विटद्वारे केली आहे.

देशात बॅन केलेल्या 59 चीनी अॅपमुळे खसगी डेटा व खासगीपण त्यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या चीनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने निवडणूक प्रचार कॅम्पेनमध्ये लाँच केलेल्या नमो अॅपवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपला लक्ष्य करत एकप्रकारे 59 चीनी अॅपवरील बंदीच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे, म्हणून सरकारने 59 मोबाइल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खसगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पुरवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे, असे चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे सुरु करण्यात आलेल्या नमो अॅपवरील डेटाच्या कथित गैरवापराबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यानंतर तपासणीत या अॅपच्या मध्यमातून वापरकर्त्यांनी दिलेल्या 22 मुद्यांची माहिती थर्ड पार्टीला पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वापरकर्त्याचे लोकेशन, छायाचित्र, कॅन्टॅक्स, मायक्रोफोन आणि कॅमेरा अशा गोष्टींचा समावेश आहे. तसेच पीएमओ इंडिया या अॅपच्या वापरकर्त्यांनी दिलेल्या 14 मुद्यांची माहिती परस्पर इतरांना परवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिटीझन एंगेजमेंट अॅप आणि माय गव्हर्नमेंट अॅप या दोन्हींच्या माध्यमातून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहितीचे साधारण नऊ तपशील थर्ड पार्टीपर्यंत पोहोचत असल्याचेही समोर आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like