Eknath Khadse on Devendra Fadnavis | … तर फडणवीस लगेच सरकार स्थापन करायला तयार होतील, एकनाथ खडसेंचा सणसणीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा कार्यक्रम योग्य वेळी करु, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे अधूनमधून करत असतात. फडणवीसांच्या या वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी खिल्ली उडवत सणसणीत टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत, त्यांची तळमळ दिसून येत आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाने साथ दिली तर ते सरकार स्थापन करायला तयार आहेत, असा टोला लगावला आहे.

PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज (सोमवार) सकाळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची निवास्थानी जाऊन भेट घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलत असताना खडसे यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पडणार का यासह इतर अनेक विषयांवर भाष्य केलं.

फडणवीसांची आजही तळमळ दिसतेय
देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत.
त्या कारणामुळे मी सत्तेत आलं पाहिजे,
यासाठी त्यांनी अजित पवारांसोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती.
परंतु, दुर्दैवाने सत्ता काही टिकली नाही.
पण आजही त्यांची तळमळ दिसतेय.
त्यामुळे सरकार स्थापन करायला असा प्रसंग आला तर कोणताही पक्षाला सोबत घेऊन ते तयार होतील, असा टोला खडसे (Eknath Khadse) यांनी फडणवीसांना लगावला.

भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता
खडसे पुढे म्हणाले, भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
आज भाजपचे आमदार असलेल्या अनेकांना मीच पक्षात प्रवेश दिला होता.
त्यांना तिकीटही मीच मिळवून दिलं होतं.
त्यामुळे ते माझ्याशी मोकळेपणाने बोलतात.
पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करतात.
ही नाराजी वाढू नये म्हणून सरकार पडण्याची वक्तव्ये केली जात असतील, असे खडसे म्हणाले.

भाजपचे उरलेले नेते मुहूर्त सांगत आहेत
महाविकास आघाडी सरकार आल्यापासून चंद्रकांत पाटील सांगतात सरकार पडणार, फडणवीस म्हणाले सरकार पडणार, भाजपचे उरलेले नेते वेगवेगळे मुहूर्त सांगत आहेत. पण सरकार पडत नाही. दिवसेंदिवस सरकार आणखी मजबूत होत आहे, असा टोला एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय