…तर पक्षाच्यावतीने ‘त्यांना’ समज देऊ : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचाच प्रचार करतात. मात्र, तशी तक्रार असल्यास आम्ही पक्षाच्यावतीने त्यांना समज देऊ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हंटले. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे . सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तुमचे विरोधी पक्षनेते भाजपा उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे फोटो फिरताहेत. तर तुम्ही लोकांकडे कशी मते मागणार? असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला होता. दरम्यान, तसे काहीही नाही. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचाच प्रचार करतात. मात्र, तशी तक्रार असल्यास आम्ही पक्षाच्यावतीने त्यांना समज देऊ. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेला, राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईचे शहर अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील अनुपस्थित होते.

याचबरोबर या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते.

Loading...
You might also like