…तर महापालिकेच्या रक्तपेढीचा परवाना निलंबित करू

अन्न व औषध प्रशासनाचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीची प्रशासनाच्या अनास्थेमुळे झालेल्या प्रचंड दुर्दशेची अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या विभागाने केलेल्या तपासणीत रक्तपेढीच्या कामकाजात आढळलेल्या गंभीर त्रुटी दूर करण्याची शेवटची संधी दिली आहे. अन्यथा रक्तपेढीचा परवाना कायमचा निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या नगर येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीत जावून सखोल तपासणी केली
होती. या दरम्यान रक्तपेढीच्या कामकाजात काय त्रुटी आढळल्या, याचा सविस्तर अहवाल तयार करून तो अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता.

या तपासणीमध्ये रक्तपेढीच्या कामकाजात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडून

नुकतेच महापालिकेला पत्र देण्यात आले असून त्यात रक्तपेढीचा परवानाच निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनपा व सर्वात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी उपायुक्त व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.