‘फिर मुस्कुराएगा इंडिया, फिर जीत जाएगा इंडिया’ ! बॉलीवूडच्या उपक्रमाला PM मोदींचा ‘सलाम’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :जगात सुरू असणारा कोरोनाचा प्रकोप पाहता इंडस्ट्रीतील बडे कलाकार एकता दाखवताना दिसत आहेत. कोरोनाबद्दल लोकांच्या नातील भीती दूर करण्यासाठी मुस्कुराएगा इंडिया नावाचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. ज्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे.

पीएम मोदींनी मंगळवारी व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, फिर मुस्कुराएगा इंडिया… फिर जीत जाएगा इंडिया. त्यांनी म्हटलं की, फिल्म जगतातील लोकांनी चांगला उपक्रम केला आहे. भीतीचं वातावरण काहीसं हलकं फुलकं करण्यासाठी बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि जॅकी भगनानी यांनी मिळून एक गाणं बनवलं आहे. देशभक्तीनं युक्त या गाण्यात अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, विकी कौशल, राजकुमार राव, सिद्धार्थ मल्होत्रा, कृती सेनन, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, कियारा आडवाणी, अनन्या पांडे, रकुल प्रीत सिंह, शिखर धवन, तापसी पन्नू, आरे मलिष्का सहित जॅकी भगनानी दिसत आहे.

अक्षय कुमार व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आपल्या जीवनात सध्या अनिश्चिततेचे काळे ढग आहेत. आयुष्य काहीसं थांबल्यासारखं वाटत आहे. या गाण्याच्या माध्यमातून आमची इच्छा आहे की, आपण एक गोष्ट निश्चित करावी की, सारं काही सामान्य होईल. फक्त आपल्याला कॉविड 19 विरोधात एकत्र उभं राहयाचं आहे. आणि मग मुस्कुराएगा इंडिया.” या गाण्याची सुरुवात पीएम मोदींच्या त्या व्हिडीओ मेसेजमधून होते ज्यात ते कोरोनाशी लढाई लढण्याबद्दल सांगत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like