BMC Elections : ‘…अन्यथा महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील’ – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिका निवडणूक BMC Elections फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक BMC Elections दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मात्र, शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

Supreme Court : न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले – ‘देवाकडे प्रार्थना करतो की लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावं’

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पेडणेकर म्हणाल्या, शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. भाजपला वाटत असेल तर उद्याच निवडणूका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. मात्र, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे पाहून निर्णय घेतला जाईल. अन्यथा, निवडणुका पुढेही ढकलल्या जातील, असे त्यांनी म्हटले.

पुण्यात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे तब्बल 11 हजार रुग्ण होते बेपत्ता, आरोग्य विभागाच्या पथकाने घेतला शोध

शेलार काय म्हणाले ?
आशिष शेलार म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच 2021 च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन राजकारण सुरु झाले आहे. मागील 25 वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यात राज्यात आता महाविकास आघाडी सरकार असून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त