… तर राज्यात वीज दरवाढ होऊ शकते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरु करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतीतील उद्योग पुन्हा सुरु करून उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी येते दिले. त्यातच सध्या अव्हरेज बिलिंगमुळे महाराष्ट्रात स्टाफचे पगार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वर्तवली आहे. मात्र, केंद्र सरकारने बिनव्याजी कर्ज दिल्यास, राज्य सरकारला मदत केल्यास निश्चितच ते टाळता येईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

मुगेरीलाल के हसीन सपने
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केद्र सरकारतर्फे ऊर्जा विभागासाठी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरसीएसीच्या माध्यमातून हे 90 हजार कोटींच पॅकेज येणार आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक संस्थांकडून हे कर्ज रुपाने पॅकेज देण्यात आलं. या कर्जावर व्याज लावण्यात आलं. तर त्याचा बोझा डेस्क ऑफवर पडले आणि त्या डेस्क ऑफचा बोझा लोकांवर पडू शकतो. त्यामुळे वीजेचे दर वाढविले जाऊ शकतात.

तर दरवाढ करावीच लागेल
आजमित्तीला 21 हजार कोटी रुपयांचं कर्ज घेऊन आम्ही वीजेचं दर कमी करून विभागाला चालवत आहोत. त्यामुळे, सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज नेमकं कशापद्धतीने देणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे जर कर्जरुपी आणि व्याजदराने हे पॅकेज दिले तर आम्हाला दरवाढ करावीच लागेल, असे डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे. सरकारने जर बिनव्याजी हे कर्ज ठराविक कालावधीसाठी दिले, तर नक्कीच लोकांवर दरवाढीचा बोझा पडणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केलं, मात्र सरकारने हे पॅकेज नेमकं कसं देणार हेही जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.