मग जितेंद्र आव्हाडांना ‘भोंदूबाबा’ म्हणावे का ? : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत,’ असं आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते. त्यांनतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक फोटो ट्विट केला आहे. त्यावर आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

आशिष शेलार ट्विटरवर म्हणाले आहे की, ‘माझ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका फॅशन डिझाइनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना “भोंदूबाबा” म्हणावे का ? असा प्रश्न पडतो. हास्यास्पदच आहे हे सारे.’

राष्ट्रवादी काँग्रेसने शेयर केलेला फोटो हा फॅशन डिझाइनरचं नाव फिरोज शकीर यांचा आहे. मी तांत्रिक नव्हे असं स्पष्टीकरण फिरोज शकीर यांनी केलं आहे. गेल्या ४० वर्षापासून ते बॉलिवूडमध्ये काम करतात. आशिष शेलार आणि फिरोज शकीर हे एकाच इमारतीत राहण्यास आहेत.

शेलार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी, ‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र केलं असेल. असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. आमच्या शक्ती आमच्या जवळ आहेत’, असं मत व्यक्त केलं होतं. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेलार यांचा मांत्रिकाच्या वेशातील एका व्यक्तीबरोबरचा फोटो ट्विट करण्यात आला होता. शेलार यांच्याबरोबर उभ्या असणारी व्यक्तीने काळे कपडे परिधान केेलेले आहेत. या व्यक्तीच्या गळ्यामध्ये अनेक माळा असून हातात मोठ्या अंगठ्या असल्याचे दिसत आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like