‘मग जरा पवारांना सांगा…’ : चंद्रकांत पाटील

पुणे/बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत. त्यामुळे पुन्हा राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. हे पवारांना देखील सांगा. त्यांना अजुनही वाटत आहे राज्यात त्यांचे सरकार येईल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष व महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. बारामती येथे भाजप संपर्क कार्यालयाचे उद्धघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातही आपलंच सरकार येणार आहे, असे म्हणून चंद्रकांत पाटील यानी उपस्थितांना प्रश्न विचारला. राज्यात आपलं सरकार येणार आहे की नाही. त्यावर लोकांनी होकार देताच मग जरा सांगा पवारांना. त्यांना अजून वाटतय की त्यांचेच येणार आहे. पण निवडणुकीनंतर मी नियमित बारामतीला वेळ देणार आहे, लोकांना आपला पक्ष वाटवा यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भीती जरा जास्त निर्माण झालीय
पृथ्वीराज जाचकांनी त्यांचा बंगला कार्यालयासाठी दिल्याचा उल्लेख करत, तुम्हाला चार फोन आले असतीलच अशी विचारणा पृथ्वीराज जाचकांकडे केली. त्यावेळी जाचकांनी 2004 मध्ये हाच बंगला भाजपचे कार्यालय होते अशी आठवण पाटील यांना करून दिली. त्यावळी आता दिवस बदलले आहेत, भीती जरा जास्त निर्माण झाली असल्याचा अप्रत्यक्ष टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.