‘ट्रिपल’ तलाकच्या पहिल्या गुन्ह्यातील आरोपी फरारच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात ट्रिपल तलाक विरोधी विधेयक मंजूर झाले. त्यावर कायदाही झाला. त्यानंतर ट्रिपल तलाकवर पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात ट्रिपल तलाकचा पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी यासंबधी माहिती दिली.

ज्या फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा नोंदवून घेतला मात्र हा देशातील पहिलाच गुन्हा असेल, याची कल्पना नव्हती, असं कड यांनी सांगितलं. तसंच ट्रिपल तलाक कायदा नुकताच अस्तित्वात आल्याने कायद्यामधील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, तसेच वरिष्ठ पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नुकत्याच झालेल्या ट्रिपल कायद्यानुसार ज्याच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, त्याला त्वरित अटक करण्यात येते. शिवाय अटक झालेल्या व्यक्तीला जामीन संबंधीत महिलेने होकार दिल्यावरच मिळू शकतो. या कायद्यानुसार आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा होण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंब्र्यात ज्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता, त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. तसंच त्याने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –