‘…तर तुझा मृतदेह देखील सापडणार नाही’, अरहानच्या चाहतीची ‘धमकी’, देवोलिनानं केली पोलिसात ‘तक्रार’

पोलिसनामा ऑनलाइन –बिग बॉस 13 चा एक्स स्पर्धक अरहान खानच्या चाहतीनं देवोलिना भट्टाचार्यला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोबतच तिनं सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांनाही धमकी दिली आहे. देवोलिनानं मुंबई पोलिसांना टॅग करत त्यांना यावर अ‍ॅक्शन घेण्यास सांगितलं आहे.

देवोलिनानं ट्विटरवरून केली तक्रार

देवोलिनानं ट्विट करत लिहिलं की, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सायबर सेल प्लीज हे मेसेज पहा. ज्यात मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तुम्हाला विनंती आहे. लवकरात लवकर यावर अ‍ॅक्शन घ्या.”

यासोबत देवोलिनानं एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यात एका लेडीनं देवोलिनासाठी लिहिलं आहे की, तू वारंवार अरहानचा अपमान करत आहेस. ज्याच्या मदतीनं तू हे करत आहेस त्यांचा आणि तुझा मृतदेह कधीच मिळणार नाही. मी रश्मी आणि सिद्धार्थबद्दल बोलत आहे. जर तू अरहानबद्दल एकदा जरी अपशब्द वापरला तर तुझा तो शेवटचा दिवस असेल.

देवोलिनाला नाही आवडत अरहान

देवोलिना रश्मी देसाईला सपोर्ट करत असल्यानंच ती अरहानच्या चाहतीच्या टारगेटवर आली आहे. बिग बॉसमध्येही देवोलिना अरहानच्या विरोधात दिसली आहे.