मोठी रक्कम घेवुन ‘या’ महिला थेरेपिस्टनं प्रस्थापित केले संबंध, नंतर बोलली रेप झाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पैसे घेऊन क्लायन्टबरोबर शारीरिक संबंध बनवल्याने पोलिसांनी एका महिला थेरपिस्टला अटक केली आहे. अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील हि घटना असून या महिलेला पोलिसांनी अटक केली असून क्रिमिनल सेक्सुअल अपराध प्रकरणात तिला 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोहन्ना ली मॅम असे या महिलेचे नाव असून या महिलेने या क्लायन्टवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. तसेच या प्रकरणात तिने पोलिसांना फसवण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी या महिला थेरपिस्टला पोलिसांची फसवणूक तसेच खोटी माहिती दिल्याबद्दल अटक केली आहे.

त्यानंतर पोलिसांनी या क्लायन्टकडे चौकशी केली असता त्याने सांगितले कि, मागील चार महिन्यांपासून दोघांमध्ये सहमतीने संबंध असून तिने अनेक मॅसेज डिलीट केले आहेत. दरम्यान, तिने आपल्या आरोपांचा स्वीकार केला असून न्यायालयाने तिला 71 लाख रुपयांच्या बॉंडवर जामीन दिला आहे.