Coronavirus : एकट्या मुंबईत 746 रूग्ण, महाराष्टात 1346 ‘कोरोना’बाधित, ‘त्या’ सर्व परिसरात SRPF तैनात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशातील आणि राज्यातील परिस्थिती देखील अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावा वाढत जात आहे. एकट्या मुंबईत तब्बल 746 कोरोनाबाधित असून संपुर्ण राज्यातील आकडा 1346 वर पोहचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असणार्‍या परिसरात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलास (एसआरपीएफ्) तैनात करण्याचा विचार सध्या राज्य सरकार करीत असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.


राज्यातील एकूण रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्ण हे मुंबई आणि पुणे विभागात आहेत. मुंबईत तब्बल 746 तर पुणे विभागात 246 कोरोनाबाधित आहेत. पुण्यात आतापर्यंत तब्बल 24 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. मुंबई आणि पुण्यातील काही परिसर यापुर्वीच सील करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असणार्‍या परिसरात राज्य राखीव पोलिस दलास तैनात करण्याचा विचार सध्या राज्य सरकार करीत आहेत. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि तो परिस्थितीला पाहून असेल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटलं आहे.