पानाच्या सेवनाचे आहेत ‘हे’ 5 मोठे फायदे; पुरुषांना विशेष फायदा, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेवण केल्यानंर अनेकांना पान सेवन करण्याची सवय असते. काही लोक दिवसभरात अनेक पान खातात. हिंदू धर्मात पानाचा उपयोग पूजेदरम्यान केला जातो. तुम्हाला माहिती नसेल परंतु पानाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पानामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. याच बाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

1) जखम बरी करण्यात मदत- घाव बरे करण्यासाठीही पानाचा उपयोग केला जातो. पानातील अँटीऑक्सीडंट तत्व जखम बरी करण्यास मदत करतात. जखमेवर लावण्यासाठी पानाच्या पत्त्यांचा रस काढला जातो. हा रस जखमेवर लावल्यानंतर जखमेवर पट्टी बांधली जाते.

2) सांध्यातील वेदना कमी होतात- सांध्यातील वेदना कमी होण्यासाठी पानाची खूप मदत होते. यातील अँटीऑक्सिडंटमुळे शरीरातील त्रास आणि घावापासून आराम मिळतो. गुघडे दुखत असतील तर गुडघ्यांना पानाचा रस लावा. यामुळे खूप फायदा मिळेल.

3) पचनक्रिया- पानामुळे पचनक्रिया चांगली राहते. जेवणानंतर जर पान खाल्लं तर पोटात दुखणं, गॅस आणि छातीत जळजळ अशा समस्यांपासून आराम मिळतो.

4) वजन कमी करण्यास मदत- रोज पानाचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहत असल्याने जेवण चांगल्या प्रकारे पचतं. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. पानातील रस शरीरातील पाचक रस वाढवण्यास मदत करतो.

5) पुरुषांना विशेष फायदा- पुरुषांना कमजोरीपासून सुटकारा मिळवण्यात पानाची खूप मदत होते. पानाचे सेवन केल्याने प्रत्येक अवयवात रक्ताचा चांगल्या प्रकारे संचार होतो. यामुळे पुरुषांमधली इरेक्शनची समस्या दूर होते.

Visit : Policenama.com