दुधाचे ‘हे’ 8 वेगवेगळे प्रकार, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सर्व वयोगटातील लोकांनी दूध सेवन करावे असे आयुर्वेदात म्हटले आहे. मात्र, ज्यांना अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी ते सेवन करू नये. दूध पचायला थोडे जड असल्याने ते योग्य वेळी म्हणजे सायंकाळ आणि रात्री झोपण्यापूर्वीची वेळ या काळात घ्यावे असे सांगितले गेले आहे. अनेक पौष्टिक घटक दुधात असल्याने त्यास पूर्णान्न म्हटले जाते. आपण दूध नेहमीच पितो, पण दूधाचे तब्बल 8 प्रकार आहेत, हे खुपच कमी लोकांना माहित आहे. शिवाय या वेगवेगळ्या दुधांचे वैशिष्ट्यही वेगवेगळे आहे, ते जाणून घेवूयात…

दुधाचे प्रकार आणि फायदे

1 गायीचे दूध
गायीच्या दुधात प्रोटिन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस, मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स असतात.

2 म्हशीचे दूध
म्हशीच्या दुधातअमिनो असिड, सिलेनियम, झिंक आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. शिवाय कोलेस्ट्रॉल कमी असते.

3 बकरीचे दूध
बकरीचे दूध पचण्यास हलके असून फॅट कमी असते. पोषक घटकही भरपूर असतात.

4 उंटाचे दूध
उंटाच्या दुधात व्हिटॅमिन सी आणि आयर्न, पोटॅशिअम, कॉपर, झिंक आणि मॅग्नेशिअम असे मिनरल्स भरपूर असते. ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल कमी असते.

5 बदामाचे दूध
या दूधात प्रोटिन, व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट घटक भरपूर असतात. कॅलरीज कमी असतात.

6 नारळाचे दूध
याच्या सेवनाने ब्लड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहाते. वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, यात पोषक घटक कमी असतात.

7 सोया मिल्क
सोयाबीन्स किंवा सोया प्रोटिनपासून तयार होणारे सोया मिल्क गायीच्या दुधाला उत्तम पर्याय असल्याचे म्हटले जाते. यामध्ये गायीच्या दुधाइतकेच प्रोटिन, फॅट आणि कार्बोहायड्रेट असतात.

8 ओट मिल्क
यात प्रोटिन आणि फॅट कमी असते. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.