निवडून आलेल्या भाजपच्या ३०३ खासदारांमध्ये एकही मुस्लिम नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए ने घवघवीत यश मिळवत तब्बल ३०३ उमेदवार निवडून आणले मात्र यात एकही मुस्लिम उमेदवार नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सात मुस्लीम उमेदवार दिले होते त्यात एकही विजयी होऊ शकला नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मुस्लीम खासदारांची संख्या वाढली आहे. २०१४ मध्ये एकूण २३ खासदार संसदेत गेले होते, यावेळी ही संख्या २७ वर पोहोचली आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण २७ मुस्लीम खासदार संसदेत पोहोचले आहेत. पण त्यात भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही.

महाराष्ट्रातून औरंगाबाद मतदारसंघातील इम्तियाज जलील हे संसदेत गेले आहेत तसेच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधून सर्वात मोठा विजय मिळवला आहे. तर उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून आजम खान, हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी आणि आसाममधून बदरुद्दीन अजमल जिंकले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सहा मुस्लीम उमेदवार विजयी ठरले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like