कृष्णवर्णीय फ्लॉइडच्या मृत्यूनंतर हिंसक निदर्शने, जाणून घ्या अमेरिकन इतिहासातील 5 मोठ्या वर्णभेदी घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्याच्या परिस्थितीत अमेरिका दोन मोठ्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे अमेरिकेत कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे आहेत आणि मृतांचा आकडा देखील सर्वाधिक आहे. तर दुसरा सर्वात मोठा मुद्दा जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील बर्‍याच शहरांत दंगल झाली आहे. अमेरिकेत शांततेत सुरु झालेल्या आंदोलनाने लवकरच दंगलीचे रूप धारण केले.

कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइडच्या मानेवर मिनियापोलिसच्या एका पोलिस अधिकाऱ्याने जवळपास आठ मिनिटे गुडघा दाबून ठेवला, ज्यामुळे जॉर्जला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. जॉर्जच्या मृत्यूनंतर शेकडो लोक अमेरिकेच्या रस्त्यावर उतरले आणि पोलिसांच्या विरोधात निषेध करण्यास सुरूवात केला. हळूहळू या निदर्शनांनी हिंसक रूप धारण केले आणि बर्‍याच ठिकाणी जाळपोळ व पोलिसांच्या गाड्या फोडल्या गेल्या. जाणून घेऊया अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा वर्णभेदामुळे निषेध झालेल्या घटना…

२००१, सिनसिनाटी

अमेरिकेच्या सिनसिनाटी येथे २००१ च्या दंगलीत ८०० लोकांना अटक करण्यात आली होती. या दंगलीचे कारण होते, सिनसिनाटीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वारंवार कृष्णवर्णीय पोलिस कर्मचाऱ्यांना गोळ्या घातल्या जात होत्या. १९ वर्षीय टिमोथी थॉमस हा १९९५ पासून त्या वेळेपर्यंत मारला गेलेला १५ वा व्यक्ती होता.

टिमोथी थॉमसला एका पांढऱ्या पोलिसांनी गोळी घातली होती. अशा घटनांनी संतापलेल्या कृष्णवर्णीयांनी निदर्शने करण्यास सुरवात केली. यानंतर लोकांनी पोलिसांवर हल्ला केला आणि दुकाने लुटली. चार दिवस दंगल चालल्यानंतर रात्रीत कर्फ्यू नियंत्रणात आला. तरीही टिमोथीला मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निर्दोष सोडण्यात आले.

१९९२, लॉस एंजिलीस

लॉस एंजेलिसमध्ये एक व्हिडिओ सतत दाखवला जात आहे, ज्यात पोलिस कृष्णवर्णीय रॉडनी किंगला सातत्याने काठीने मारहाण करत आहेत. एक व्यक्ती या घटनेचा व्हिडिओ घेत होता. एका पांढऱ्या अमेरिकन ज्युरीने या प्रकरणाची सुनावणी केली आणि गोऱ्या/ पांढऱ्या पोलिसाला निर्दोष सोडण्यात आले.

अमेरिकेतील पांढऱ्या ज्युरीच्या या निर्णयानंतर २० व्या शतकातील सर्वात वाईट दंगलीची सुरुवात झाली. या दंगलीत सुमारे ५० लोक मारले गेले आणि २००० लोक जखमी झाले. इतकेच नव्हे तर त्यावेळी अमेरिकेत झालेल्या दंगलीमुळे सुमारे एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.

१९८०, लिबर्टी सिटी

१९८० मध्ये अमेरिकेच्या कोर्टाने चार पांढऱ्या पोलिसांना निर्दोष ठरवले होते. या पोलिस कर्मचार्‍यांनी कृष्णवर्णीय दुचाकी चालकाला रेड लाईट क्रॉस केल्यामुळे इतके मारले की, त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लिबर्टी सिटीमध्ये आंदोलने झाली, त्यांनी लवकरच हिंसक रूप धारण केले. या दंगलींमध्ये १८ मृत्यू झाले होते आणि सुमारे चारशे लोक जखमी झाले होते. त्यावेळी अमेरिकेला १०० कोटी डॉलर्सचे नुकसान झाले होते.

१९६८, मार्टिन ल्युथर किंगची हत्या

४ एप्रिल १९६८ रोजी कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणार्‍या मार्टिन ल्यूथर किंगची हत्या झाली, तेव्हा अमेरिकेच्या बर्‍याच शहरांमध्ये हिंसाचार भडकला. या दंगलींमध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे दोन हजार लोक जखमी झाले होते. सर्वात जास्त हिंसा शिकागो, बाल्टिमोर आणि वॉशिंग्टनमध्ये झाली होती. वॉशिंग्टनमध्ये तर मार्टिन ल्यूथर किंगच्या हत्येनंतर काही वेळातच दंगल सुरू झाली होती. त्यावेळी ही दंगल रोखण्यासाठी अमेरिकेत दहा हजार सैनिक तैनात करावे लागले होते.

१९६७, डेट्रॉईट

२३ जुलै रोजी डेट्रॉईटमध्ये सुरू झालेल्या दंगलीचे कारण होते बेकायदेशीर बारमधील छापा. त्यावेळी दोन व्हिएतनामी पार्टी करत होते. पोलिसांनी बारमध्ये उपस्थित सर्व ८० जणांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर हिंसाचार सुरू झाला. पाच दिवस झालेल्या दंगलीनंतर ४३ लोकांचा जीव गेला आणि एक हजार जखमी झाले. या दंगली दरम्यान सात हजार लोकांना अटक करण्यात आली होती.