न्यायमूर्ती लोया प्रकरणाची चौकशी नाही ? गृहमंत्री म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चीत न्यायमूर्ती बी.एच. लोया मृत्यू प्रकरणात चौकशी होणार नाही असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. अद्याप याबाबत कोणीही पुरावे दिले नाहीत अशी माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी लोकांनी केली आपल्याकडे अनेक वेळा केली आहे, मात्र अद्याप कोणीही पुरावा दिला नसल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

न्यायमूर्ती लोया प्रकरणात काही लोकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिले होते. सोहराबुद्दीन शेख चकमकीच्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी लोया हे न्यायाधिश होते. यापूर्वी राज्यातील भाजप प्रणीत सरकारने 2018 मध्ये न्यायालयात या प्रकरणाची गंभीर चौकशी केल्याचे सांगितले होते. त्याच्या तपासणी अहवालानुसार न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे सांगण्यात आले.

जस्टीस लोया प्रकरणात जास्त माहिती नाही. केवळ वृत्तपत्रामध्ये काही लेख वाचल्याने या प्रकरणाची माहिती मिळाली. या प्रकरणाची चौकशी मूळापर्यंत जाऊन केली जावी अशी भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. माझ्याजवळ यासंबंधी सविस्तर माहिती नाही मात्र मागणी होत असेल तर सरकार याबाबत विचार करेल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

त्याच प्रमाणे चौकशीची मागणी करणारे कोणत्या आधारावर मागणी करत आहेत. त्यांच्या मागणीमध्ये तथ्य आहे का याची चौकशी केली पाहिजे. जर काही आढळले तर रिइन्व्हेस्टीगेशन करायला पाहिजे. मात्र काहीच नसेल तर एखाद्याविरुद्ध आरोप लावण्यासाठी असे करणे चुकीचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी व्यक्त केले होते. दरम्यान राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन चकमक खटल्याची जबाबदारी होती. त्यावरून त्यांना सतत धमक्या दिल्या जात होत्या. तसेच मार्च 2015 मध्ये विष देण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप करत याप्रकरणाच्या चौकशीची मागणी सतिश उके यांनी केली होती.

फेसबुक पेज लाईक करा –