सासवड नगरपालिकेच्या ‘आरक्षित’ जागेवर ‘अतिक्रमण’ !

सासवड : सासवड तालुका :  पुरंदर, येथील नगरपालिकेच्या सिटी सर्वे क्रमांक १२७ गटावर नगरपालिकेने आरक्षण टाकले असून सासवड येथील काही लोकांनी आरक्षित असणाऱ्या गटावर कोणतीही परवानगी न घेता बांधकामाचा व टपऱ्या टाकण्याचा धडाका जोरदारपणे लावला आहे. सासवड येथील सिटी सर्वे क्रमांक १२७ नगरपालिकेने आरक्षण क्रमांक ६३ मध्ये विकली मार्केट आणि शॉपिंग सेंटर त्याचबरोबर 12 मीटर व 15 मीटर डीपी दोन रोड तसेच पुणे पंढरपूर 40 मीटर रोडणे बाधित झालेला आहे.

उर्वरित जागा ही सार्वजनिक वापर विभागासाठी दर्शवला आहे. असे आरक्षण असताना देखील स्थानिक नागरिकांनी मात्र असणाऱ्या गटावर राजरोसपणे घराची बांधकाम व टपऱ्या टाकलेल्या आहेत. याबाबत बहुजन समाज पार्टीचे महासचिव सागर लक्ष्मण जगताप यांनी गट नंबर १२७ मधील अनधिकृत अतिक्रमणे काढणे बाबत तहसीलदार व सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की सासवड नगरपालिकेने या गटावर आरक्षण टाकल्यामुळे आमची नाव सातबारा मध्ये असून आम्ही आजपर्यंत कोणतेही बांधकाम केले नाही. तर स्थानिक रहिवाशांनी त्या जागेमध्ये अनधिकृतपणे बांधकामे व पाया भरलेले आहेत. तरी ८ दिवसांमध्ये त्वरित ही अतिक्रमणे काढण्यात यावीत अशी मागणी केली आहे.

याबाबत सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या असून ३० दिवसांमध्ये अतिक्रमणधारकांना आपले लेखी म्हणणे व कागदपत्रे सादर करावी. ती सादर न केल्यास संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केली जातील. मुळातच या गटावर नगरपालिकेचे आरक्षण असल्यामुळे नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी दिलेली नाही असे सासवड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.

Visit : Policenama.com