‘या’ मराठी अभिनेत्रीनं अवघ्या 15व्या वर्षी दिला होता ‘रेप’ सीन, झाली होती ‘अशी’ अवस्था !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी हिंदी सिनेमातील बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री अशी ओळख तयार करून प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी सिनेमात पदार्पण केलं तेव्हा त्या दिसायला खूप कोवळ्या असल्याने त्यांना बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या करिअरमधील रेप सीनच्या किस्स्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

पद्मिनी कोल्हापुरे यांना इन्साफ का तराजू या सिनेमात चक्क रेप सीन द्यायचा होता. दिग्दर्शकाने याबाबत सांगताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या खूपच घाबरल्या. कारण एकतर हा रेप सीन तब्बल 5 ते 6 मिनिटांचा होता आणि या सीनसाठी त्यांच्या मनाची तयारीही नव्हती.

खास बात अशी की, या रेप सीन वेळी पद्मिनी अवघ्या 15 वर्षांच्या होत्या. त्यांच्या आईने त्यांची समजूत घातल्याने त्यांना थोडा धीर मिळाला. पद्मिनी या सीनसाठी तयार झाल्या. हा सिनेमा रुपेरी पडद्यावर आल्यानंतर सगळ्यांनी पद्मिनी यांचं खूप कौतुक केलं. यानंतर त्या अभिनयाच्या बाबतीत एक कलाकार म्हणून त्या अधिक समृद्ध झाल्या असे त्यांनी स्वत:च एका मुलाखतीत सांगितले होते.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी इन्साफ का तराजू, अहिस्ता अहिस्ता, प्रेमरोग, विधाता, प्यार झुकता नही, सौतन, वो सात दिन अशा अनेक सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मराठीतही त्यांनी आपलं काम दाखवलं आहे. चिमणी पाखरं, मंथन असे त्यांचे सिनेमे सांगता येतील.

पद्मिनी कोल्हापुरे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच त्या मराठीत झळकणार आहेत. प्रवास या सिनेमातून त्या अशोक सराफ यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. दोघेही प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्याव्यतिरीक्त विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदी कलाकारही दिसणार आहेत. यश आणि नातं यातील प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

 

Visit : Policenama.com