देशात चांदीच्या आयातीत 96 टक्क्यांची घट, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार चांदीच्या आयातीमध्ये 96 टक्के घट झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या महिन्यात देशात चांदीची आयात केवळ 11.28 टन झाली, जी पूर्वीच्या तुलनेत 96 टक्के कमी आहे. 2019 मध्ये चांदीची एकूण मागणी 5,598 टन होती, तर 2020 मध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) 1,468 टन चांदी आयात केली गेली. अशा परिस्थितीत चांदीच्या आयातीत अचानक घट होण्याची अनेक कारणं आहेत.

चांदीच्या कमी विक्रीचे प्रमुख कारण ठरले कोरोना साथीचा आजार – संपूर्ण जगाबरोबरच भारत सध्या कोरोना साथीशी लढत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत बाजारात चांदीची मागणी कमी आहे. त्याचबरोबर मार्केटद्वारे जुनी चांदी बाजारात आल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

दरमहा 300 टन चांदीचा स्क्रॅप बाजारात येत आहे-

उद्योग मंत्रालयाच्या मते गेल्या वर्षी देशात चांदीचा स्क्रॅप शून्य होता, परंतु यावर्षी दरमहा सुमारे 300 टन चांदी स्क्रॅपच्या रूपात बाजारात येत आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान झिंक बाजारात दरमहा 40-50 टन चांदी विकत आहे. दुसरीकडे, 2011 मध्ये चांदीची गुंतवणूक करणारे आता वाढत्या दरामुळे चांदीची विक्री करुन नफा कमवत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, MXC मध्ये चांदीची किंमत 77 हजार रुपयांच्या वर पोहोचली – MCX मध्ये चांदीची किंमत 77949 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्यामुळे लोक त्यांच्या घरात ठेवलेली चांदी बाजारात विकत आहेत. या विक्रीमुळे आयत देखील कमी झाली आहे. जर चांदीचे दर कमी असतील तर त्याच्या आयातीमध्ये वृद्धी दिसून येईल. सणासुदीच्या हंगामात मागणीत वाढ दिसून येईल. अहवालानुसार चांदीची अंदाजे आयात यावर्षी 3200 ते 3500 टन आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्के कमी आहे.