उमेदवारीबाबत काँग्रेसमध्ये एकमत घडेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार हायकमांडच ठरविणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी काँग्रेस नेते आणि इच्छुक यांची बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम उपस्थित होते.

बैठकीमध्ये पक्षातील इच्छुक उमेदवार मोहन जोशी, अभय छाजेड, चंद्रकांत शिवरकर आणि अरविंद शिंदे यांच्याशी नेत्यांनी स्वतंत्रपणे बोलणी केली. आमदार अनंत गाडगीळ यांच्या वतीने शिष्टमंडळाने निरीक्षकांची भेट घेतली. मात्र पुण्यातील उमेदवारीबाबत एकमत झाले नाही असे समजले.

पुण्याच्या पातळीवर एकमत घडावे असा प्रयत्न पक्षाने केला. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार लादला अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होवू नये असाही हेतू बैठकीमागे होता. २०१४च्या निवडणुकीत उमेदवार लादल्याची तक्रार झाली आणि प्रचारात फटका बसला. त्या अनुभवामुळे वारंवार बैठका घेण्यात आल्या असे पक्षाच्या नेत्याने स्पष्ट केले.

पुण्याचा निर्णय घेण्यास हायकमांड आता मोकळे झाल्याने उमेदवारीची उत्सुकता वाढली.

…नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या होतील