गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवरुन भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा उल्लेख हटवला आहे. गणेशोत्सवाचे जनक कोण ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये वाद सुरु आहे. शुक्रवारी पुणे महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवर भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम १८९२ साली पुण्यात गणेशोत्सव सुरु केला अशी माहिती प्रसिद्ध केली होती. यावरुन वाद झाल्यानंतर आता पुणे महापालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03a9dadf-ab70-11e8-8b6c-09a7cefba4b7′]

भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईट वरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्ट ने पुणे पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक सायबर सेल पुणे यांच्याकडे पुणे महानगरपालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
खुशखबर ! सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांचा महागाई भत्ता वाढला

ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. स्वातंत्र्याचा लढा त्या वेळी जोरात चालू होता. लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करणे गरजेचे झाले होते व तत्कालीन क्रांतिकारकांची बैठक भाऊसाहेब रंगारी यांच्या बुधवार पेठ सध्याचे रंगारी भवन येथे पार पडली होती व घरातला गणपती सार्वजनिक रित्या रस्त्यावर बसवून ऊत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरले व त्यानुसार सर्वात प्रथम इ सन 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणपती सार्वजनिक रित्या बसविला व उत्सव साजरा केला. 1894 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रथम पुणे येथे विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. त्यानंतर गणपती ऊत्सवाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16ecbad8-ab70-11e8-a926-3de0f6e301af’]

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी व टिळक दोघांचा उद्देश ब्रिटिश राजवटी विरूध्द व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा ऊभा करायचा हाच होता. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक आहेत त्यांचे श्रेय त्यांना मरणोत्तर मिळावे व खरा इतिहास बाहेर यावा यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट काही वर्षं प्रयत्न करत आहे.

पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची नोंद केली असून गणेशोत्सवाचे साल १८९२ च नमूद केले आहे. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे पुणे महानगरपालिकेचे काल महापालिकेत झालेल्या बैठकीत आभार मानले व लगेचच त्याच रात्री बारा च्या सुमारास महानगरपालिकेच्या वेबसाईट वरून “1892 सालात भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली” असा मजकूर होता हा मजकूर अचानक काढून टाकण्यात आला.

पुण्याचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार

महानगरपालिकेच्या या कृत्या विषयी व इतिहासाची मोडतोड केली, खोटा इतिहास पसरविला, खरा इतिहास लपवून ठेऊन समाजाची दिशाभूल केली म्हणून पुणे पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक सायबर सेल, महापालिका आयुक्त, महापालिका सायबर सेल प्रमुख व महापौर यांचेकडे रितसर तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कायदा सल्ल्गार अॅड. मिलींद पवार व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने सचिव राजेन्द्र गुप्ता, विश्वस्त सुरज रेणुसे, बाळासाहेब निकम यांनी सांगितले आहे.

महानायक अमिताभच्या मदतीने ५० शेतकरी कर्जमुक्त