हे पुणे आहे… येथे आहे चक्क बोलणारा नोटीस बोर्ड 

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन 

आजपर्यत तुम्ही अनेक नोटीस बोर्ड पाहिले असतील ज्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या  लिखित स्वरूपात सूचना लिहलेल्या असतात. पण  पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेज मध्ये आगळ्यावेगळ्या प्रकारचा  नोटीस बोर्ड बसवण्यात आला आहे. हा नोटीसबोर्ड बोलणारा नोटीसबोर्ड  बोर्ड आहे. कारण या नोटीस बोर्ड्वरुन नोटीस फक्त वाचता नाही तर ऐकता देखील येते.
[amazon_link asins=’B07B4THQHM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2447b314-91a5-11e8-bf75-8fd71a102ae2′]

दृष्टीहीन विद्यार्थ्यांकरीता हा नोटीस बोर्ड लावण्यात आला आहे. दृष्टीहीन विद्यार्थी देखील इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आहेत. त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नये याकरिता कॉलेजमार्फत हा नोटीसबोर्ड बसवण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात एकूण ३२ दृष्टीहीन विद्यार्थी आहेत. विद्यर्थ्यांना या नोटीस बोर्ड चा उपयोग व्हावा याकरिता अशा प्रकारचा नोटीस बोर्ड  तयार करण्यात आला आहे. हा ऑडिओ नोटीस बोर्ड एआईएसएसएम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे माजी विद्यार्थी नंदन गवे आणि अंकिता पवार यांच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. नोटीस बोर्डवर  एक हेडफोन ठेवण्यात आला आहे. तसेच १,२,३ अशी बटणे आहेत जी बटणे दाबून आपल्या भाषेत सूचना ऐकता येते. बोर्डवर येणाऱ्या सूचनांकरिता कॉलेजमधील एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमधील सदस्यांद्वाराच सूचनांचे रेकॉर्डिंग तयार करण्यात आले. नोटीस बोर्ड ला बसवण्याकरीता एकंदरीत २५००० रुपये खर्च आला आहे.