‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

नाशिक न्युज (Nashik News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – anil parab | गृहमंत्री अनिल देशमुख ( Home Minister Anil Deshmukh) यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपानंतर त्यांना राजीनामा (Resignation) द्यावा लागला होता. त्यानंतर परिवहन विभागा (Transport Department) त  भ्रष्टाचार (Corruption) व अनागोंदी होत असल्याचे तक्रारींबरोबर परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab) यांच्यापासून विविध सचिव व आरटीओ (RTO) च्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, चौकशीत नाशिक (Nashik) शहरात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा अहवाल समितीने पोलीस आयुकत दीपक पांडेय यांना दिला आहे. there is no fact in the complaint against anil parab nashik police report submitted clean chit

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील (Motor Inspector Gajendra Patil) यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस (Panchavati Police) ठाण्यात दिली होती.
यावरुन भाजपने अनिल देशमुख नंतर आता अनिल परब यांचा नंबर असे आरोप केले आहेत. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतली.
त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्याच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची स्थापना करुन चौकशी सुरु केली. दोनदा मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरा दिवसात चौकशी पूर्ण केली.

या चौकशी समितीने राज्याच्या अवर सचिव, उपसचिवांपासून नाशिक, धुळे, जळगाव आदि जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओची कामे करणारे खासगी व्यक्ती आणि तक्रारदार अशा सुमारे ३५ हून अधिक जणांकडे चौकशी केली. त्यांचे जाबजबाब नोंदविले.

तक्रारदार पाटील यांनी चौकशी समितीला दररोज एक एक पुरावे सादर केले. तक्रारदारांनी दिलेले पुराव्याची समितीने शहानिशा केली. या तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला नसल्याचे  चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे पोलीस आयुक्त पांडेय यांनी स्पष्ट केले आहे. या तक्रारीतील अन्य तथ्यांबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : there is no fact in the complaint against anil parab nashik police report submitted clean chit

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Pune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून केले अटक

‘या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा