मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची मानसिकता नाही; मराठा आंदोलकांचा आरोप

परळी : पोलीसनामा ऑनलाईन

18 जुलै रोजी या आंदोलनाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करून आज पाच दिवस झाले. राज्यभरात 58 आंदोलने केली, या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक निवेदने शासनाला दिले परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. म्हणून आम्ही राज्यातील समन्वय समितीने चर्चा करून ठोक मोर्चाचे आयोजन केले. आमचं आंदोलन हे पूर्ण लोकशाही मार्गाने असून कोणत्याही प्रकारचे शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c02ae33-8db2-11e8-8502-f17821a45401′]

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली पण समाजाची फसवणूक झाली. कोपर्डी प्रकरणाच्या संदर्भात शासनाने दिरंगाई केल्याने आरोपी आजही मोकाट आहेत. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची अजिबात इच्छा नाही. या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी अनेक घोषणा करून राज्यातील जनतेची आणि माइथ समाजाची फसवणूक केली आहे. शासनाच्या गलिच्छ धोरणांमुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, या आत्महत्या नाहीत तर हे राज्य सरकारने केलेले खून आहेत आणि म्हणून शासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नुकसान शासनाने केले आहे. या महामंडळाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे आज मराठा समाजाचे नुकसान झालं आहे. शासनाने सारथी सारखी संस्था स्थापन केली, परंतु त्याला अजूनही कार्यालय मिळाले नाही. फिस माफीत सुद्धा आमची फसवणूक झाली आहे. शेयकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृहाची आमची मागणी होती, जोपर्यंत हे वसतिगृह बांधण्यात येणार नाहीत तोपर्यंत त्याचा मोबदला विद्यार्थ्यांना द्यावा अशी मागणी होती परंतु आजतागायत ती पूर्ण झाली नाही.

विधिमंडळ अधिवेशन चालू असतांना सरकारने मेघा नोकर भरती जाहीर केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केले. जाहीर झालेल्या मेघा नोकर भरतीत 16 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील असे सांगितले. पटलावर घेतलेल्या विषय संदर्भात आम्हाला पत्रही दिले. परंतु आरक्षण जाहीर झालेले नसताना या जागा राखीव कशा ठेवणार? असा प्रश्न आहे.

2 लाख जागा रिक्त असतांना 70 हजार जागांचा बॅकलॉग येतो, मग जर 70 हजार जागा भरल्या तर कोणत्याही स्वरूपात रिक्त जागा राहणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आमची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, अथवा मेघा नोकर भरती रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. सरकारच्या शिस्तमंडळाला आमच्याशी चर्चा करायची असेल तर त्यांनी परळीत येऊन करावी. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन असेच लोकशाही मार्गाने सुरू राहणार असल्याची घोषणा परळीतून करण्यात आली आहे.

उद्या या आंदोलनामुळे जे काही घडेल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. आम्ही मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता की पंढरपूर येथे महापूजेला जाऊ देणार नाही, राज्यातील शेतकऱ्यांना आणि समाजाला फसविल्याने आम्ही हा इशारा दिला होता. यापुढे मराठा समाजाची जी दिशा ठरेल ती परळीतून ठरणार आहे, परळी व्यतिरिक्त कोणीही पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याचा आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आणि समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही अशी घोषणा आजच्या परळीत आंदोलन स्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. ज्यांना कोणाला आपली समाजाविषयी भूमिका मांडायची असेल त्यांनी परळीलाच यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0745BNFYV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’729ee15d-8db2-11e8-bef0-352aece0676b’]

आमचा मुख्यमंत्र्यांवर भरोसा नाही, त्यांनी जरी महापूजेला जाणार नसल्याचे सांगितले असले तरी आम्ही त्याबाबत दक्ष आहोत. जाहीर करून जरी मुख्यमंत्री पंढरपूरला गेले तर त्याठिकाणी त्यांना अडवण्यासाठी आमची मोठी फौज पंढरपूरला उभी आहे. जोपर्यंत मेघा नोकर भरती रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही परळीतून परतणार नाही अशी घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. राज्यभरातून मोठा प्रतिसाद या आंदोलनाला भेटत असून, भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होईल याची शासनाने नोंद घेवून जे घडेल त्याची जबाबदारी सरकारवरच असेल असेही सांगण्यात आले.

आज तहसील समोरील आंदोलन स्थळी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे सर्व राज्य समन्वयक उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील, संजय सावंत, अमित घाडगे, शंकर कापसे, ज्योतिताई सपाटे यांच्यासह सर्व उपस्थितांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.