Coronavirus Impact : राज्यातील जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात लॉकडाऊन असले तरी जनतेला जीवनावश्यक सेवा मिळणार आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यासाठी प्रशासन सज्ज असून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. जनतेकडून लॉकडाऊन दरम्यान सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जनतेला त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना धान्याऐवजी पीठ देण्याचं नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून दिली.

लॉकडाऊन दरम्यान शेतीची कामे करण्यास निर्बंध नाहीत. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टिंग मशिन आणल्या गेल्या आहेत.त्यांनाही पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पेट्रोल पंपावर हार्वेस्टींग मशिनला इंधन दिले जाईल असे थोरात यांनी सांगितलं.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून देण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले.