‘या’ देशात गरिबी औषधालाही शिल्लक नाही !

लंडन : वृत्तसंस्था – असे अनेक देश आहेत जेथे गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. फूटा फूटावर गरिबी पाहायला मिळते. अनेक लोक असे आढळतील ज्यांना चक्क उपाशी झोपावं लागतं. शेजारी राहणाऱ्या लोकांनी काही नवीन वस्तू किंवा काही खरेदी केली तर त्यावर कुरकुर करत आपल्याकडे काहीच नसल्याचं रडगाणं गाणारेही कमी नाहीत. परंतु जगात असे काही देश आहेत जेथे गरिबी तुम्हाला तिळाइतकीही सापडणार नाही. जे कधी कशावरून तक्रारही करत नाहीत. याचबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
लक्झमबर्ग, स्वित्झर्लंड आणि मकाओ हे असे देश आहेत. जिथे गरिबी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. विशेष म्हणजे हे देश जीडीपीनुसार श्रीमंत देश म्हटले जातात. अजूनही एक ओळख म्हणजे ज्या देशात कधीच कोणी उपाशी झोपत नाहीत असे देश. परंतु या देशांच्या यादीत अजूनही काही नावे जमा झाली आहेत. एक यादी नव्याने समोर आली आहे त्यात सिंगापूर, ब्रुनई आणि कुवैत या देशांचाही समावेश आहे. या देशात शेजार्‍याने अमूक वस्तू खरेदी केली, आम्ही नाही, असेही कुणी कुरकुरत नाही.
युरोपमधील सर्वात श्रीमंत देश म्हणजे लक्झमबर्ग हा मानला जातो. या देशात अनेक श्रीमंत लोक ठराविक वयानंतर या देशात राहायला येतात. या देशात आरामात आयुष्य जगता येते. कर वाचवणार्‍यांचा देश म्हणूनही या देशाकडे पाहिले जाते. युरोपमधील श्रीमंत देशांच्या यादीत असणारा दुसरा देश म्हणजे स्वित्झर्लंड आहे. या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. सिंगापूर 63 द्वीपसमूहांनी बनले आहे. पर्यटनावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेला हा देशही श्रीमंत आहे. ब्रुनेई हा आग्‍नेय आशियातील श्रीमंत देश. गॅस आणि कच्च्या तेलाची निर्यात या देशातून होते.
कतार या देशाची लोकसंख्या जवळजवळ 20 लाख आहे. शिवाय या देशाचा जीडीपी जवळजवळ 182 बिलियन डॉलर आहे. तेलाची निर्यात, टुरिझम, बँकिंग यावर देशाची अर्थव्यवस्था आहे. नॉर्वेला उगवत्या सूर्याचा देश मानले जाते. या देशाची जीडीपी नेहमीच चांगली असते. नैसर्गिक गॅस आणि तेल यांच्या निर्यातीवर या देशाची अर्थव्यवस्था आहे.