कोर्टाने काम करायला काय हरकत आहे ? – प्रशांत भूषण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्याासाठी तसेच व्यावसाय-उद्योगधंद्याला चालना मिळण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आता कोर्टाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे. सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करत कोर्टातील प्रक्रिया आता सुरू करायला काही हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. शाळा, कॉलेज, मंदिर, मस्जिद, बाजार, रेल्वे, वाहतूक, कोर्ट आणि इतर सार्वजनिक ठिकाणे सरकारने बंद केली होती. पण चौथ्या लॉकडाउनमध्ये नियमांत शिथिलता देऊन अनेक ठिकाणे उघडण्याची परवानगी दिली आहे.

त्याच पार्शभूमीवर प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी सोशल डिस्टिंगचे पालन करत कोर्टाचे कामकाज चालू ठेवायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगऐवजी आता न्यायालयाने प्रत्यक्ष कामकाज न करण्याचे कोणतेही कारण नाही. कोर्टामध्ये न्यायाधीश एकमेकांपासून दोन मीटर अंतरावर बसू शकतात. तसेच एखाद्या प्रकरणात सामील असलेल्या वकिलांना आणि दोन्ही पक्षातील एकाला उपस्थित राहण्याची परवानगी देऊ शकतात. ही सर्व कारवाई व्हिडिओस्ट्रीमद्वारे केली जाऊ शकते.