‘राज ठाकरे महाआघाडीत नकोच’ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसने स्पष्ट नकार कळवला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इतकेच नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले. यासंदर्भात प्रस्तावही त्यांनी काँग्रेसकडे पाठवला होता. मात्र समविचारी पक्षांची आघाडी असावी असा महाआघाडीचा उद्देश आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत स्थान नाही, असे स्पष्टपणे राष्ट्रवादीला कळवले आहे.
असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.इतकेच नव्हे तर,समविचारी पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन झाली आहे.मनसे आणि आमच्या विचारधारेत फरक आहे.त्यामुळे आघाडीमध्ये मनसे नको ही भूमिका राष्ट्रवादीला कळवली आहे,असे त्यांनी म्हंटले.
 इतकेच नव्हे तर, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार जागा दिल्या आहेत. आता फक्त त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, यांच्या उत्तरानंतर पुढचे पाऊल ठरवण्यात येईल असेही त्यांनी म्हंटले.