मराठा आरक्षण : माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास IPS विश्वास नांगरे पाटील, CM देवेंद्र फडणवीस जबाबदार : गुणरत्न सदावर्ते

मुंबई : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या जीवाला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून धोका असल्याचे म्हटले आहे. काल मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

त्याचबरोबर हे आरक्षण न्यायालयीन शिस्तीचा भंग असून याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी देखील सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले आहेत.

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील तसेच जाधव आडनावाचे एक पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी नाव घेतले आहे. हे दोन अधिकारी मराठा असल्याने त्यांच्या कडून देखील आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या माझं काही बरं वाईट झाल्यास त्याला नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,’ असा धक्कादायक आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण दिले होते. त्यानंतर त्याविरोधात अनेक जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या यांच्यामध्ये जयश्री पाटील यांची बाजू गुणरत्न सदावर्ते हे मांडत होते. मात्र काल न्यायालायने निर्णय देताना मराठा आरक्षणाला अखेर मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली यामध्ये मात्र सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या निर्णयात हायकोर्टाने शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण वैध आहे असं म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी आरक्षण मंजूर जरी झाले असले तरी ते अनुक्रमाने १२ आणि १३ टक्के आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या १६ टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावर हि लढाई सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आता कोण आव्हान देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी