Alert ! WhatsApp वर ‘या’ मेसेजपासून रहा सावध, नाहीतर रिकामे होईल तुमचे Bank Account
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp आजकाल तुमचे जीवन सोपे करीत आहे, हे धोकादायक देखील असू शकते. बँकिंगपासून ते व्हॉट्सअॅपपर्यंतच्या वैशिष्ट्यांनंतर हे अॅप अधिक संवेदनशील झाले आहे. हेच कारण आहे की, आता आपले व्हॉट्सअॅप देखील हॅकर्सच्या निशाणावर आहे. आज आम्ही आपल्याला एक विशेष मेसेजसह सावध करू इच्छितो. यासंदर्भात दुर्लक्ष केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
वेबसाइट इंडिया डॉट कॉमनुसार, सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पार्ट टाईम नोकरीच्या ऑफर तुमच्या व्हॉट्सअॅपवर पाठवल्या जातात. असे म्हणतात की, आपण घरी आपल्या मोबाइलमधून पार्ट टाईम नोकरी करुन पैसे कमवू शकता. या नोकरीत तुम्ही दररोज केवळ 10-30 मिनिटे काम करून 200 रुपयापासून ते 3 हजार रुपये कमवू शकता. नवीन युजर्सला 50 रुपयांचा बोनसही मिळेल. मेसेजमध्ये एक लिंक खाली देण्यात आली आहे, ज्यावर क्लिक करून त्यात सामील होण्यासाठी सांगितले गेले आहे. त्यावर क्लिक केल्यास आपण बनावट मेसेजचे शिकार व्हाल.
आपल्याला असा मेसेज आल्यावर काय करावे?
आपणास व्हॉट्सअॅपवर किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर असे मेसेज आल्यास, ज्या नंबरवरून आपल्याला मेसेज मिळाला आहे तो नंबर त्वरित ब्लॉक करा. मेसेज देखील हटवा जेणेकरून त्यात दिलेली लिंक चुकून क्लिक होऊ नये. बनावट पार्ट टाईम नोकरीचा हा मेसेज बहुधा कोड +212 या क्रमांकावरून येत आहे. हे मेसेज वेगवेगळ्या नंबरवरून पाठवले जात आहेत. असा मेसेज भारताच्या कोड +91 या क्रमांकावरून आला असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करा. कधीकधी फसवणूक करणारे मोठ्या कंपन्यांच्या नावाने असे मेसेज पाठवतात, म्हणून आपण सावधगिरी बाळगा. काहीही फ्री उपलब्ध नाही हे नेहमी लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत, जर काही मेसेज काही मिनिटांत हजारो कमावण्याचा दावा करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल.
बनावट मेसेजमध्ये सामील लिंक सहसा मैलवेयर असतात (व्हायरसचा एक प्रकार). लिंकवर क्लिक केल्यावर, हे मैलवेअर युजर्सच्या फोनमध्ये इन्स्टॉल होते. हे युजर्सकडून इतर आर्थिक तपशील किंवा त्यांच्या एटीएम पिन, कार्ड नंबर यासारख्या वैयक्तिक तपशीलांसाठी विचारतात. नंतर हा डेटा बेकायदेशीरपणे वापरला जातो.