काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाशिवआघाडीत कसलीच अडचणी नाही, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ आमदारानं सांगितलं

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाली आहे. आता कोणतीही अडचण नाही अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अ‍ॅड के सी पाडवी यांनी दिली आहे. महाशिवआघाडी लवकरच सत्ता स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आघाडी यशस्वी व्हावी यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे आणि महाशिवआघाडीबाबत चर्चा केली आहे. के सी पाडवी या समितीतील ज्येष्ठ सदस्य आहेत. याबाबत त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “आघाडीबाबत आता कुठलीही अडचण राहिलेली नाही. तिन्ही पक्षांनी काही मुद्द्यांवर चर्चा करून मसुदाही तयार केला आहे. हे मुद्दे तयार करताना सरकार 5 वर्षे कसे चालेल याचीही पूर्ण काळजी घेतली गेली आहे.”

पुढे बोलताना पाडवी म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतील आणि सर्व मुद्द्यांना अंतिम रूप देतील. यानंतर लवकरच राज्यात सत्ता स्थापन केली जाईल.” असेही त्यांनी सांगितले. याशिवाय मुख्यमंत्री व इतर मुद्द्यांवर प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र मौन बाळगले.

Visit : Policenama.com