अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाला माझा विरोध नाही : छगन भुजबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षासोबत जावून सत्ता स्थापन करणारे अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीमध्ये विचारमंथन सुरु आहे. त्यामुळे अद्याप उपमुख्यमंत्रीपदी कोण हे राष्ट्रवादीने स्पष्ट केले नाही. छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्याला आपला विरोध असण्याचा प्रश्नच नाही असे छगन भुजबळ असे म्हटले आहे.

अजित पवार भाजपसोबत गेले असताना त्यांना परत आणण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विरोध करणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसेच पक्षात कोणाला कोणतं पद द्यायचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ठरवतील. पदाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

शरद पवार हे योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी देतील यात शंका नाही. अजित पवार यांच्याविषयीचा निर्णय तेच घेतील. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असतील तर त्याला आपला विरोध नसल्याचा पुनरोच्चार केला. अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. त्यांच्या या कृतीमुळे खुद्द शरद पवार नाराज झाले होते आणि पक्षात मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या मंत्रीपदावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like