Pooja Chavan Suicide Case : चव्हाण कुटुंबीयांवर अन्याय होऊ नये, रोहित पवार यांची भूमिका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्याने कारवाई करत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 12 ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवल्या आहेत. यामुळे या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी चव्हाण कुटुंबीयांवर अन्याय होऊ नये असे म्हटले आहे.

पुण्यातील मांजरी येथी कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन त्यांनी आज शेतकऱ्यांसोबत संवाद साधत व्हॅलेटाईन डे साजरा केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जे दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, या गोष्टीचे राजकारण करु नये असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार पुढे म्हणाले की, या प्रकणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सत्य समोर येईलच. पण, पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावरही अन्याय होता कामा नये, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, गोगोई यांनी न्याय व्यवस्थेविषयी जे वक्तव्य केले, ते भीतीदायक असून सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होऊ नये, असे त्यांनी म्हटले.