‘या’ कारणामुळे दांडेकर पुलाजवळ दुर्घटना घडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जनता वसाहत येथे कालव्या खालून जाणाऱ्या मोरी पासून काही अंतरावर कालव्याच्या तळाशी छोटे विवर तयार झाले होते. पाण्यामुळे ते अधिक मोठे होत गेले आणि वरील भराव खचल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान कालव्यालागत टाकण्यात आलेल्या वीज वाहिन्या आणि केबल्सला पाटबंधारे विभागाने परवानगी दिली नव्हती. या वाहिन्या काढून टाकण्याचे संबंधितांना कळविण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’478c3355-c2f0-11e8-b4d5-a710bc9dc074′]

जनता वसाहत येथे काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुठा उजवा कालव्याला मोठे भगदाड पडल्याने मोठी दुर्घटना घडली. पाण्याच्या लोंढ्यात दांडेकर पूल झोपडपट्टीतील 250 हुन अधिक झोपडयाची पडझड होऊन शेकडो नागरिक बेघर झाले. पाटबंधारे विभाग आणि महापालिकेने या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. उद्या संध्याकाळ पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यानी सांगितले. या कामासाठी कालवा बंद ठेवण्यात येणार असून पुढील दोन दिवस लष्कर जळकेंद्रातून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत राहील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या

नागरिकांच्या मदतीला महिला पोलीस सरसावल्या
कालवा फुटलेल्या झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार : बापट
पुण्यात भर उन्हात पूर परिस्थिती , पाहणीसाठी आलेल्या महापौरांना घेराव
जनता वसाहत जवळचा मुठा कालवा फुटला ; गाड्यांचे नुकसान