काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच होणार, मुंबईसह राज्यात होणार मोठे फेरबदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे. परंतु काँग्रेस लवकरच आपल्या पक्षात मोठे बदल करणार आहे. यामध्ये लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई काँग्रेसमध्येही येत्या एकदोन महिन्यांत मोठे फेरबदल दिसतील, अशी माहिती काँग्रेसचे नवे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा ऊर्फ एच.के. पाटील दिली आहे. एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.या निर्णयाविषयी अधिक बोलताना पाटील म्हणाले,आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा दौरा करू. मी राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा खास आहे, असे बोलले जाते.

राज्यात काँग्रेससाठी काम करणारे सगळेच नेते माझ्यासाठी खास आहेत. महाराष्ट्रात कुठलीही गटबाजी आपण चालवू देणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. मुंबई काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल केले जाणार असून या शहरांतही पक्ष मजबूत झालेला दिसेल. मिलिंद देवरा यांच्यासह सर्वांना विश्वासात घेऊन फेरबदल केले जाणार असल्याचे देखील यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना पाटील यांनी संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने सेक्युलर शब्दावरून जी टिप्पणी केली, ती त्यांना शोभा देत नाही. त्यांनी घटनेने दिलेल्या औचित्याचा भंग केला आहे.

घटनेने धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या दिलेल्या विश्वासार्हतेला राज्यपालांच्या पत्रामुळे धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. केवळ मुख्यमंत्रीनीच नाही तर देशातील नागरिकांनी देखील धर्मनिरपेक्ष रहाण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळे लढण्याच्या भूमिकेवर बोलतं पाटील यांनी पटेल हे मोठे नेते आहेत. ते आमच्या नेत्यांशी थेट बोलू शकतात. त्यांना कोणते मुद्दे अडचणीचे वाटले, मला माहीत नाही. मात्र, बिहार असो की अन्य कुठलेही राज्य, चांगल्या प्रस्तावांचे काँग्रेस नेहमीच स्वागत करेल, असे म्हटले आहे.