राणे असेपर्यंत कोकणचे कोणी वाकडे करू शकणार नाही : निलेश राणे

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राणे असे पर्यंत कोकणचे कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही. मी अर्धी निवडणूक जिंकलो आहे, अर्धी निवडणूक येत्या दिवसांत जिंकेन. असे वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान एका आयोजित सभेत उपस्थितांना संबोधतांना, २०१४ च्या मोदी लाटेत माझा पराभव झाला. परंतु तो माझा पराभव नव्हता आणि विनायक राऊत यांचा विजयही नव्हता, तर तो मोदींचा विजय होता. पाच वर्षांत सेना-भाजपाच्या सरकारनं काय केलं, फक्त भांडणं केलीत. रत्नागिरीला अद्यापही सत्ताधाऱ्यांनी न्याय दिलेला नाही. राणे असेपर्यंत कोकणचे कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही. मी अर्धी निवडणूक जिंकलो आहे, अर्धी निवडणूक येत्या दिवसांत जिंकेन, कोणाच्याही मी कधी वैयक्तिक अंगावर गेलेलो नाही. ही निवडणूक कोकणच्या विकासाची आहे. असे निलेश राणे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मागची पाच वर्षं फुकट गेली, आता येणारी पाच वर्षं फुकट घालवू नका, असही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, खंबाटाकडून विनायक राऊत यांनी ४०० कोटी घेतले आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. विनायक राऊतांमुळे कामगारांची कुटुंब उद्धवस्त झाली. जोपर्यंत राणे साहेब आहेत, तोपर्यंत कोकणावर अन्याय होणार नाही. रत्नागिरीत तीन आमदार असूनही पालकमंत्री जोगेश्वरीतला केला. कोकणाला ओळख द्यायची असेल तर डांबर चोर, मीटर चोरांना सभागृहात पाठवू नका असेही राणे यांनी म्हंटले.