बँकांची NEFT सेवा ‘या’ दिवशी काही तास राहणार बंद, RBI ची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत घरात बसून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. 23 मे रोजी NEFT सेवा काही वेळासाठी बंद राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. दरम्यान या कालावधीत RTGS प्रणाली मात्र सुरू राहणार आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी रात्री 12. 01 मिनिटापासून दुपारी 2 वाजेपर्यंत NEFT सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत आरटीजीएस प्रलाणी मात्र सुरुच राहणार आहे. RTGS साठी याप्रकारचे अपडेट यापूर्वी 18 एप्रिल रोजी पुर्ण केले होते. अनेक जण मोठी रक्कम देण्यासाठी NEFT सेवेचा वापर करतात. या माध्यमातून रक्कम पाठवण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही. दरम्यान सध्या छोट्या मोठ्या देवाणघेवाणीसाठी युपीआयला अनेकांची पसंती असते. परंतु याद्वारे देवाणघेवाण सरासरी 1 हजार रूपयांवर कायम आहे. कोरोना काळात आयएमपीएस (IMPS) द्वारे सरासरी 9 हजार रूपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन्स करण्यात आली. यापूर्वी ती 6 ते 7 हजार दरम्यान होते.