भिंतीखाली सापडून दोन भावांसह मेव्हुण्याचा जागीच मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – स्पेस सथ्था कॉलनी येथे भिंत पाडण्याचे काम सुरू असताना भिंत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी ही घटना घडली आहे आहे. त्यामध्ये दोन भावांसह मेव्हुण्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

रोहन विजय फुलारी (वय-२२, बुरुडगाव, ता.नगर), राहुल विजय फुलारी (वय-२६, बुरुडगाव, ता.नगर), गोविंद शंकर शिंदे (वय-३२, बुरुडगाव) हे तीन मजूर सदर बांधकामावर काम करत होते. त्यावेळी अचानकपणे भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यानंतर तत्काळ तेथे पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने मलब्याखाली अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले. यात दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. तिसऱ्या मजूराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like