…म्हणून प्रियंका गांधींना मोदींविरोधात उमेदवारी दिली नाही : काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाराणसी लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्च्या विरोधात निवडणूक लढणार असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व हे निवडणूक हरण्यासाठी लढू शकत नाही. असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे असल्यामुळे प्रियंका गांधींना उमेदवारी दिली नसल्याचे समोर आले आहे.

प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढत असलेल्या वाराणसी मतदार संघातून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. तशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. जर पक्षाने तिकीट दिले तर वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी तयार असल्याचे त्यांनी म्हंटले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींविरोधात प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात होती. मात्र अखेर त्या चर्चेला काल पूर्णविराम लागला. मात्र इच्छा व्यक्त करूनही प्रियंका गांधी यांना वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या उमेदवारी संदर्भात काँग्रेस हायकमांडने कांग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व हे निवडणूक हरण्यासाठी लढू शकत नाही. असे अनेकांचे मत होते. इतकेच नव्हे तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपतींना फोन करुन यासंदर्भात विचारले, त्यावेळीही गांधींनी हरण्यासाठी निवडणूक लढू शकत नाही. प्रियांका गांधी या पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी आहेत. त्यामुळे त्या पूर्व उत्तर प्रदेशसह संपूर्ण युपीमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत. जर प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली तर त्यांचे काम वाराणसीपुरते मर्यादीत राहील, त्यांना इतर मतदार संघांमध्ये काँग्रेसचा प्रचार करता येणार नाही. असेही त्यांनी म्हंटले. त्यामुळे प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे.